सी पि राधाकृष्णन यांनी भरला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज, पंतप्रधान नरेंद्र मोदी होते उपस्थित.
नवी दिल्ली :-
रा. लो. आघाडी (NDA) चे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उप राष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज भरला. राज्यसभा सचिवालय येथे त्यांनी अर्ज भरला. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी,संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि किरण रिजिजू भाजप प्रणित रा.लो.आ. (NDA) चे चिराग पासवान यांच्या सह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला.
फोटो सोर्स केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एक्स वरून घेतला आहे.
पि. टी. आई या वृत्तसंस्था नुसार, राधाकृष्णन आणि एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांसह मोदींनी उपराष्ट्रपती निवडणुकीचे निवडणूक अधिकारी असलेले राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी यांना नामांकन पत्रांचे चार संच सादर केले.
काही दिवसांपूर्वी माजी उपराष्ट्रपती जगदिप धनखड यांनी त्यांच्या पदाचा तब्येतीचे कारण सांगत राष्ट्रपती यांना राजीनामा पाठविला होता. त्यामुळे ही जागा रिकामी झाली होती. त्यानंतर काही दिवसांतच उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली. त्याला अनुसरून भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदीय बोर्ड येथे बैठक बोलावली. उमेदवार संबंधी चर्चा घडवून आणली आणि बैठकीत नाव मंजूर करून घेतले. नंतर राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडी चे उमेदवार म्हणून सी पि राधाकृष्णन यांचे नाव जे पि नड्डा यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना केले आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी विरोधी पक्षातील शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांना सी पी राधाकृष्णन यांच्या बाजूने मत देण्याचे आवाहन केले आहे. सी पि राधाकृष्णन यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील असून, ते महाराष्ट्रातील मुंबई चे मतदार आहेत. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
AIMIM, YSR काँग्रेस , AIMIM, भारत राष्ट्र समिती या पक्षांनी उपराष्ट्रपती निवडणूक मध्ये समर्थन कुणाला असेल याबद्दल अधिकृत रित्या जाहीर केलेलं नाही.
0 टिप्पण्या