प्रख्यात वकिल ते खासदार पर्यंतचा प्रवास
उज्वल निकम प्रख्यात वकील असून, त्यांनी अनेकदा सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहेत. 1993 चा मुंबई येथील बॉम्बस्फोट केस असो किंवा 26/11 च्या हल्ल्या मध्ये सापडलेला अजमल कसाब केस असो न्यायालयात योग्य बाजू मांडत गुन्हेगारांना शिक्षा देण्यात व 1991 मध्ये झालेल्या कल्याण बॉम्बस्फोटा साठी रवींद्र सिंह यांना दोषी ठरवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. कोर्ट रूम मध्ये काम करता करता त्यांनी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये त्यांच नशीब आजमावून बघण्याच प्रयत्न केला पण त्यांना त्याच्यात अपयश मिळालं. त्यांनी उत्तर मध्य मुंबई मधून निवडणूक लढवली. जनतेला वेगळाच निकाल मान्य असल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
उज्ज्वल निकम यांनी ही निवडणूक कमळ चिन्हावरून लढवली होती. पूनम महाजन यांच लोकसभा उमेदवारीच तिकीट कापून भाजपने उज्वल निकम यांना दिली. त्यांच्या विरोधात काँग्रेसने प्रा. वर्षा गायकवाड यांना संधी दिली होती. प्रा.वर्षा गायकवाड यांनी दारुण पराभव करत 16,514 फरकाने विजय मिळवला.
सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना राष्ट्रपती निर्देशित खासदार पदी वर्णी लावली जाते. या कॅटेगिरी मध्ये बसत असल्याने राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून त्यांची निवड करण्यात आल्याचे लोकांमध्ये चर्चा आहे. पेशाने वकील असल्याने आणि आता खासदार नियुक्त या दोघांमध्येही ते कसा समतोल राखतात हे बघण्यासारखा आहे. सरकारने संतोष देशमुख या प्रकरणांमध्ये त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांना या केस मध्ये काम करता येणार की नाही याबाबत शंका निर्माण होत आहे. उत्तर मध्य मुंबई मतदार संघातून पराभूत झाल्या नंतर त्यांनी वकिली पेशा कडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्याच्या एक वर्षा नंतर राष्ट्रपती तर्फे थेट राज्यसभेत खासदार म्हणून वर्णी लागली.
"पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अभिनंदनाचा वर्षाव केला"
राज्यसभा खासदार नियुक्त झालेल्या चारही सदस्यांचे अभिनंदन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमांवर केलं. राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर उज्वल निकम यांनी प्रथम माध्यमांशी संवाद साधला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. डॉ. मीनाक्षी जैन, हर्षवर्धन शृंगला यांनी सुद्धा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री यांचे समाज माध्यमांवर आभार मानले.

0 टिप्पण्या